सीए संपूर्ण माहिती मराठीत
विद्यार्थी मित्रांनो तुमचा इंटरेस्ट जर कॉमर्स फील्डमध्ये आहे किंवा तुम्ही कॉमर्स घेऊन शिक्षण केले आहे, तर सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हे एक चांगले करिअर ऑप्शन आहे. CA होणे ही बहुतेक कॉमर्स विद्यार्थ्यांची इच्छा असते.
सीए शिक्षण करत असताना तुम्ही स्टायपेंड च्या माध्यमातून पैसे कमवू शकता. तसेच झाल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरीची चांगली संधी उपलब्ध असते.
तुम्हाला जर कोणत्याही कंपनीत काम करायचं नसेल तर तुम्ही स्वतःची फार्म ओपन करून चांगले उत्पन्न मिळू शकतात सोबतच इतरांना जॉब देऊ शकता. मागील पोस्टमध्ये तशी सविस्तर माहिती आम्ही दिलेलीच आहे.
सीए चे काम काय आहे
मित्रांनो आर्थिक विषयांमध्ये सल्ला देणे, फायनान्शिअल अकाउंटिंग करणे, टॅक्स संबंधित कामे करणे, ऑडिटिंग चे काम करणे इत्यादी काम सीएच्या असते. सीए भारतातील सर्वात जास्त डिमांड व रेप्यूटेशन असलेला कोर्स आहे.
सीएच्या कोर्सची डिमांड मार्केटमध्ये कधीही कमी होणार नाही. व्यापारावर संपूर्ण जग आधारित आहे जेवढा व्यापार वाढेल तेवढे सीएची डिमांड वाढत जाणार आहे. सीए असणाऱ्या लोकांना खूप सन्मान मिळतो व चांगला पगार तसेच उत्पन्न मिळत असते.
सीए करिता नोंदणी कशी करावी?
मित्रांनो भारतामध्ये CA EXAM फक्त Institute Of Chartered Accountants Of India मार्फतच होते. तुम्ही ICAI च्या www.icai.org या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून सीए चा अभ्यास सुरू करू शकता.
सीए अभ्यासक्रम किती स्टेप्स मध्ये असतो?
पुढील तीन स्टेप्स मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो
1. CA FOUNDATION
2. CA INTERMEDIATE
3. CA FINAL
CA foundation :- इयत्ता दहावी नंतर तुम्ही सीए फाउंडेशन साठी नोंदणी करू शकता व बारावी पास झाल्यानंतर तुम्ही सीए फाउंडेशन चे पेपर देऊन ही लेवल क्लियर करू शकता. याकरिता फाउंडेशन परीक्षा देण्यापूर्वी चार महिन्यांचा अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करावा लागतो.
सीए फाउंडेशन मध्ये दोन पेपर लेखी स्वरूपाचे असतात व दोन पेपर ऑप्शनल बेसिस असतात. ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयात 40 गुण व एकंदरीत 50 टक्के गुण हवे असतात. सीए फाउंडेशन परीक्षा मे आणि नोव्हेंबर महिन्यात वर्षात दोनदा होते.
CA Inter :- सीए फाउंडेशन परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही सीए इंटरमिजिएट साठी रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला आठ महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. सीए इंटरमीडिएट मध्ये आठ विषय असतात जे दोन ग्रुप मध्ये विभागलेले असतात.
या पेपरमध्ये पास होण्यासाठी प्रत्येक विषयात कमीत कमी 40 गुण व सगळ्या विषयांचे नोंद 50 टक्के गुण आवश्यक असतात. जेव्हा तुम्ही एक किंवा दोन ग्रुप क्लियर करता तेव्हा तुम्ही इंटर्नशिप करू शकता सोबतच चार आठवड्यांचा इंटिग्रेट आयटी आणि सॉफ्ट स्केल प्रोग्राम कम्प्लीट करावा लागतो. तेव्हाच तुम्ही तीन वर्षाच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग साठी एनरोल करू शकता. ही ट्रेनिंग तुम्ही कोणत्याही सीएफ फॉर्म मधून करू शकता. सीए फॉर्म निवडण्यापूर्वी तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की तुम्हाला त्या फॉर्म मधून भरपूर काही शिकायला मिळेल, कारण या ट्रेनिंग वरच तुमचे भविष्य अवलंबून असते.
CA Final :- जेव्हा तुम्ही अडीच वर्षाची Internship पूर्ण करता तेव्हा तुम्ही सीए फायनल साठी पात्र होता. CA FINAL मध्ये आठ पेपर असतात जे चार चार विषयांमध्ये विभागलेले असतात. यामध्ये देखील पासिंग साठी तुम्हाला प्रत्येक विषयात 40 टक्के गुण व एकंदरीत 50 टक्के गुण असणे आवश्यक असते. सीए फायनल पूर्वी तुम्हाला चार महिन्याचा IT & SOFT SKILL PROGRAM पूर्ण करावा लागतो, तेव्हाच तुम्ही CA FINAL साठी पात्र होऊ शकतात. Internship व फायनल चे दोन्ही ग्रुप्स पूर्ण पास होतात तेव्हा तुम्ही सीए बनता.
स्टाईपेंड किती असतो?
जेव्हा तुम्ही Internship करायला लागतात तेव्हा तुम्हाला स्टायपेंड
मिळण्यास सुरुवात होते. कोणत्या फॉर्म मध्ये तुम्ही काम करता यावर तो अवलंबून असतो त्याचे रक्कम साधारणपणे पाच ते पंधरा हजार एवढी असू शकते.
सीए चा कोर्स करण्यासाठी किती कालावधी लागतो?
जर तुम्ही प्रत्येक परीक्षा वेळेवर पास झाला तर तुम्ही पाच वर्षात सीए बनू शकता, परंतु असे फार कमी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते. कारण सीए हा कठीण कोर्स आहे. सीए मध्ये तुम्हाला येथे ट्रेनिंग पूर्ण करावे लागते व त्यासोबतच अभ्यास व पेपरही द्यावे लागतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना CA बनण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागतो.
सीए झाल्यानंतर तुम्हाला जॉब कुठे मिळेल?
सीए पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जॉब साठी जास्त पहावं लागत नाही कारण सी ए फायनल नंतरच तुम्हाला जॉब करायला सुरुवात होते आणि ICAI सुद्धा जॉब प्लेसमेंट करतात जिथे देशातील मोठ्या मोठ्या कंपनी येतात व तुम्हाला चांगल्या पॅकेज व जॉब ऑफर करतात.