फ़ॉलोअर

बुधवार, 26 अप्रैल 2023

The Art of Richness






*💰श्रीमंत होण ही देखील एक कला आहे.*

    *श्रीमंत होणे आणि करोडपती बनणे ही तशी अनेकांना न रुचणारी गोष्ट आहे.* त्यातच मी जर म्हणालो की वयाच्या 35 व्या वर्षी तुम्ही "करोडपती" बनू शकता तर अनेकांना हा कल्पनाविलास वाटेल.
 यात न रुचण्यासारखे किंवा वाईट असे काहीच नाही.

*१. पैसे वाढवायला शिका.*
आजच्या आर्थिक जगात जिथे पैसा ही गरजेची गोष्ट बनली आहे, धनसंचय करणे आणि तो वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्याकडे येणारा पैसा सातत्याने वाढत राहायला हवा. सुरुवातीला माझी मिळकत महिना रू.3000 इतकी होती. 5 वर्षांनी ती महिना 30,000 रूपये इतकी झाली. 
15 वर्षांनी ही मिळकत महिना 3,00,000 रूपये इतकी झाली त्यामुळे पैशाने पैसे वाढवायला शिका. त्यातून नवीन संधी निर्माण करा.

*२.नुसता दिखावा नको, काम दिसू द्या!*
   माझ्या विविध व्यवसायातून आणि गुंतवणुकीतून जेव्हा मला निश्चित पैसे मिळू लागले, तेव्हा मी मोठी गाडी घेतली. पूर्वी मी मारूतीची साधी गाडीच वापरत होतो.
आज 2 चारचाकी गाड्या वापरतोय.
तुमची ओळख तुमच्या नितीमुल्यांवरून,कामावरून व्हायला हवी, तुमच्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींवरून नाही. हे लक्षात ठेवा.

*३. गुंतवण्यासाठी बचत करा...*
पैशांची बचत करा, पण फक्त गुंतवण्यासाठी. वाचवलेले पैसे एखाद्या सुरक्षित आणि अशा ठिकाणी गुंतवा जिथून सहजासहजी काढता येणार नाहीत. या पैशांचा वापर कधीही करू नका. अगदी निकडीच्या प्रसंगी सुद्धा. 
यामुळे वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडील पैसा वाढत जाईल. 

*४. तुम्हाला पैसे मिळवून न देणारे कर्ज काढू नका.*
एक नियम बनवा, आपल्याकडे येणारा पैसा वाढवण्यासाठीच कर्ज काढायचे. नाहीतर काहीही उपयोग नाही. मी दुकान गाळा व कार साठी कर्ज घेतले, कारण मला खात्री होती की त्यामुळे माझी मिळकत वाढेल. श्रीमंत लोक घेतलेल्या कर्जाचा वापर गुंतवणूक आणि कॅशफ्लो वाढवण्यासाठी करतात. गरीब लोक कर्जाचा वापर वस्तू विकत घेण्यासाठी आणि श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्यासाठी करतात. 
बॅकेतून कमी व्याजाने कर्ज घेऊन योग्य नियोजन करून संपत्ती💰📈 वाढविता येते.
व्यवसाय तुमचा,पैसा दुसर्यांचा हे तत्व  लक्षात घ्या!

*५. पैशांवर प्रेम करायला शिका.* 
आर्थिक स्वातंत्र्य कुणाला नको असते. आपल्याकडे भरपूर पैसे असावेत अशी सगळ्या लोकांची इच्छा असते. पण पूर्ण त्यांचीच होतात, जे तिला प्राधान्य देतात. 
 पैसे मिळवून देणार्या गोष्टींना प्राधान्य  द्या ! श्रीमंत होण्यासाठी आणि श्रीमंती टिकण्यासाठी *पैशाला अग्रक्रम द्या.* तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. किंवा तुम्हाला सोडून त्याच्याकडे जाईल, जो त्याचे महत्त्व जाणतो. 

*६. पैसा कधीही झोपत नाही.*
पैशाला घड्याळ कळत नाही, वेळापत्रक, सुट्ट्या याचा विचार तो करत नाही, आणि तुम्हीसुद्धा नाही केला पाहिजे. पैसा त्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांची मेहनतीची तयारी असते. जेव्हा मी 20 ते 35 वर्षांचा होतो, तेव्हा मी 18 तास काम करायचो  विमा विकायचो,प्लाॅट विकायचो. *नेहमी इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्या!* पैसा झोपत नाही,तुम्हीही जास्त झोपू नका!

*७. गरीब राहण्यात काहीही अर्थ नाही...*
मी सुद्धा गरीबच होतो आणि ते जीवन खूप निराशाजनक असतं. अपमानास्पद वागणूक मिळणार असत, त्यामुळे आपण गरीब आहोत “ठीक आहे” असे विचार मनात असतील, तर लगेच काढून टाका. बिल गेट्स म्हणतात, *‘तुम्ही गरीब म्हणून जन्मलात, तर तो तुमचा दोष नाही; पण गरीब म्हणून मराल, तर मात्र तुमचाच दोष आहे.”* माझे वडील माझ्या वयाच्या तिसर्या वर्षी वारले.
मी दूध पोहचविणे, पेपर लाइन टाकणे,शिकवणी घेणे,
आंबे-फणस विकणे, गाड्या धुणे.अशी कामे करून पैसे मिळविले. *ज्या ज्या गाड्या🚗 धुतल्या, त्या त्या गाड्या🚕 घेतल्या!*
श्रीमंत व्हायचंय हे मनाशी पक्के ठरवा.

*८. श्रीमंत माणसांचा आदर्श ठेवा.*
आपल्यापैकी बहुतेकजण गरीब किंवा मध्यमवर्गीय असल्यामुळे आपले विचार, आपली स्वप्नं ही जवळच्या इतर लोकांसारखीच मर्यादित असतात. 
मी नेहमी श्रीमंत लोकांचा अभ्यास करायचो आणि त्यांच्या सारखं वागायचा प्रयत्न करायचो. तुम्ही सुद्धा एखादी आदर्श व्यक्ती निवडा आणि त्यांचे अनुकरण करा. बहुतांश श्रीमंत लोकं त्यांच्याजवळील ज्ञान आणि संसाधनं वाटण्याच्या बाबतीत अत्यंत उदार असतात. 

*९). नेहमी मोठा विचार करा
लोक सगळ्यात मोठी चूक कुठली करत असतील,
 तर ती चूक  मोठा विचार न करणे होय!
माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की, फक्त करोडपती नाही तर अब्जाधीश बनण्याचा प्रयत्न करा. या जगात पैशांची कमतरता नाही, तर मोठा विचार करणाऱ्या लोकांची आहे. 
पण.. स्मार्ट वर्क करा.

🟥🟥🟥
*१०) नेटवर्किंग करा*
श्रीमंत होण्यासाठी तुमचं नेटवर्क मोठं करा.माझ नेटवर्क खुप मोठं आहे.त्याचा उपयोग मला माझ्या व्यवसाय वाढीसाठी होतो.
🟥🟥🟥

*११)स्नेहसंबंध जोपासा.*
चांगल्या ओळखी मुळे अनेक काम पार पडतात.लोकांचा आदर करा.
कधी कोणती व्यक्ती आपल्या कामाला येईल हे सांगता येत नाही. 
म्हणून माणसं जपा.हसत मुखाने सर्वांशी प्रेमाने वागा. 

*१२. पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा.*
श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या कामातून तुम्हाला जितके पैसे मिळतात, त्यापेक्षा जास्त पैसे गुंतवणूकीतून मिळायला पाहिजेत. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसा नसेल, तर तुम्ही कधीही गुंतवणूक करू शकणार नाही.


Follow the blog. 


कोई टिप्पणी नहीं:

सीए संपूर्ण माहिती मराठीत / CA Course Details in Marathi 2023

  सीए संपूर्ण माहिती मराठीत विद्यार्थी मित्रांनो तुमचा इंटरेस्ट जर कॉमर्स फील्डमध्ये आहे किंवा तुम्ही कॉमर्स घेऊन शिक्षण केले आहे, तर सीए म्...